आयफोनसाठी २५ टक्के आयात शुल्क द्यावे लागेल   

अ‍ॅपलच्या टीम कुक यांना ट्रम्प यांचा इशारा

वॉशिंग्टन : अ‍ॅपल कंपनीने भारतात आयफोन बनवू नये, अशी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मागणी फेटाळून लावली असून आता दीड अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे जाहीर केले आहे. यानंतर ट्रम्प यांनी आयफोनची विक्री अमेरिकेत करायची असेल तर २५ टक्के आयात शुल्क द्यावे लागेल, असा इशारा दिला आहे. 
 
अ‍ॅपल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांनी भारतातील गुंतवणुकीबाबत घोषणा केली आहे. ते म्हणाले, भारतात आयफोन निर्मितीसाठी कंपनी प्रथमपासूनच इच्छुक आहे. त्यामुळे आम्ही दीड अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहोत. या निर्णयावर ट्रम्प यांनी इशारा दिला की, भारतात आयफोनची निर्मिती करुन ते अमेरिकेत विकण्याचा प्रयत्न केला तर २५ टक्के आयात शुल्क लादले जाईल.  
 
दरम्यान, काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी अ‍ॅपल कंपनीला भारतात आयफोनची निर्मिती करु नये. असा इशारा दिला होता. त्या इशार्‍याकडे अ‍ॅपलने दुर्लक्ष केले होते. यानंतर आता भारतात निर्मितीसाठी गुंतवणूक करू, असा इशारा खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांनी दिला आहे. त्यावर ट्रम्प शांत बसलेले नाहीत. त्यांनी आता आयात शुल्काचे हत्यार उपसले असून २५ टक्के आयात शुल्क आकारु, असा इशारा दिला आहे. 
 

Related Articles